About Us

ABOUT US

Welcome to shubh Soyrik

*विनंती + विनंती +नम्र विनंती🙏🏻🙏🏻

_राजकारणी+समाजसेवक अथवा शैक्षणिक,व्यवसायिक,इत्यादी कोणत्याही अधिकार पदावर असलेल्या तमाम समाजबांधवांकडुन_

शुभ सोयरीक वधू-वर सेवा केंद्र _

ला पुढील प्रमाणे सहकार्य अपेक्षित आहे....._

*_🌼ही संकल्पना नेमकी काय व कशासाठी...?_*

_हे आपल्या सकल मराठा समाज बांथवाना आपण समजावुन सांगाल अशी आग्रहाची विनंती आहे._

*"समाजाचं आपण देणं लागतो"* _हा आमचा कृतीशिल संकल्प आहे ... त्यासाठी हा सारा प्रयत्न._

_आपल्याकडे मागच्या पिढीपर्यत सुद्ढ समाज व्यवस्था होती, ज्यात विवाहकार्य जुळविण्यात अनेक समाजसेवी , प्रतिष्ठीत जेष्ठ व्यक्ती आपले सामाजिक कर्तव्य समजुन विवाह जुळविण्यात सक्रिय व अग्रेसर रहात होते._

_मात्र कालपरत्वे व्यक्तिगत गरजा , कामाचे स्वरुप यामुळे स्वतःच्या_ _कुटूंबियालाच पुरेशा वेळ देता येत नाही त्यामुळे इच्छा असुनही या परंपरागत_ *"सुन/जावईशोध "* _कामात नेहमी सहभागी होता येत नाही .वेळ देता नाही_ 

_यास्तव , ही निकड लक्षात घेऊन सर्वांच्या_ *'किमान'* _सहकार्याने परंतु सर्वांच्या_ *'कमाल'* _सुखासाठी आम्ही हि *सकल मराठा वधु वर थेट भेट मेळावा* आपल्या दारी घेऊन येत आहोत_

*_🌼सकल मराठा समाजातील नाव नोंदणीबद्दलचे गैरसमज व वस्तुस्थिती..!!_*

*1)* _ज्यांचे कोणी पाहणारे नाहीत अशा शहरी लोकांसाठी हे फॅड आहे. अल्प शिक्षित ,शेतकरी इत्यादी ना याचा काय फायदा..?_

*2)* _आमची मुलगी /मुलगा सुंदर ,सुशिक्षित, सुस्थितीत आहे.त्यामुळे आम्हाला गरज नाही_ .

*3)* _अनोळखी ठिकाणी लग्न जमविण्यापेक्षा नात्यात पाहू या इत्यादी वैगरे_

*4)* _ज्यांची लग्ने जमत नाहीत व चांगले स्थळ मिळत नाहीत तेच अशा परीचय मेळाव्यात नोंदणी करतात अशा प्रतिगामी विचार काही पालक करतात . वास्तविक संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे अख्ये जग आपल्या मुठीत सामावले आहे .त्या बद्दलचा समाज बांधवांनी स्विकार करायला हवा .खात्री न करता मत बनवणे चूक होय._

*_🌼आताची वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या..!!_*

*1)* _हल्ली प्रत्येकाजवळ वेळ नसणे ,वाढती महागाई आणि त्यामुळे स्वकेंद्रित विचारसरणी बळावत चाललेली आहे .त्यामुळे स्थळ शोधायला साहजिकच मर्यादा येतात .या शिवाय सतत स्थळ दाखवणे / पहायला जाणे त्यासाठी प्रवासखर्च + चहापाणी+ नाश्ता+ जेवण+ भेटी इ.चा अनावश्यक खर्च टाळता येवू शकतो_.

*2)* _वेबसाईट + फोटो अल्बम फाईलमधील नोंदणी+ परीचय_ _मेळाव्यामुळे भरपुर स्थळांमधून आपणास अनुरुप असे अनेक चांगली स्थळे शोधता येतात . आणि चौकस राहुन योग्य निर्णय घेता येतो_

_आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरील प्रमाणे सतत होणारा प्रवास व अन्य खर्च ,वेळ आणि श्रमाची बचत होते._

*3)* _उलट नविन संबंधामुळे नवीन नाती व नवीन गावे जोडली जातात .हा सर्वात मोठा फायदा आहे_ 

*4)* _स्थळ पाहण्यासाठी नातेवाईक ,मित्रमंडळी जरी असले तरी त्याला सुध्दा बर्याच मर्यादा_ _आहेत.उलटपक्षी या नाव नोंदणीत भरपुर पर्याय असल्याचा फायदा घेता येतो आणि म्हणजे निर्णय आपण व आपल्या कुटूंबियाचा असल्याने नशिबाला किंवा दैवाला दोष देण्याची गरज भासत नाही इतका सुंदर पर्याय आहे हा...!!_

*5)* _अनोळखी ठिकाणी लग्न कसे जमवायचे याचे सरळ सोपे उत्तर आहे कि, आपला मराठा समाज सर्वत्र पसरलेला आहे .कोठे ना कोठे नातेसंबंध निघतातच अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी_ *"व्यापक दृष्टीकोन"* ठेऊन आपल्या मुलामुलीचे एकमेव हित समोर जाती -पोटजाती आणि गावापलिकडे नविन नाती जोडुन समाजपुढे आदर्श ठेवलेला आहे.विशेष म्हणजे_ *'कोणीही आपल्या काळजाच्या तुकड्याची जीवापाड काळजी घेतोच*'

_त्यामुळे थोडी काळजी आणि चांगली चौकशी केल्यास जोडीदार सहजगत्या मिळतो_

*🌼पालकांनी काय करावे व काय करु नये ..🌼*

*1)* _जन्मतारीख,वय, शिक्षण,नोकरी(खरी/खोटी)या साठी बिनधास्तपणे अधिकृत कागदपत्र पहावित.त्यासाठी ठामपणे मागणी करावी त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न उदृभवत नाही_ 

*2)* _आणि अशा प्रकारच्या चौकशीचा ज्यांना राग येत असेल तर नक्कीच त्या स्थळाला नकार देता येतो .कारण-_ _आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न निगडीत असतो_

*3)* _कोणत्याही परीस्थितीत मुलींचे मोबाईल नंबर बाॅयोडाटामध्ये देऊच नये._

*4)* _स्थळाची व कुटूंबियाची वर्तणुक ,सामाजिक सांपत्तिक स्थितीची निर्भीडपणे खात्री करा._

*5)* _केवळ होकार आला तर हुरळून जाणे_ _आणि नकार आला तर नाराज होणे हे टाळण्यासाठी स्वतः पालक आणि_ _मुलामुलींनी प्रत्यक्ष जावुन चौकशी करणे ही काळाची गरज आहे व तेच आपल्या वधु-वर च्या हिताचे आहे._

_स्पष्टवक्त सुखीभव ..! ही वृत्ती ठेवावी म्हणजे नंतर पश्चाताप करावा लागत नाही ..._

जय जिजाऊ...🚩

 

🖋... जयकिसन वाघपाटील

📱🪀9130950999